Pune Vande Bharat Train News : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. दरम्यान राज्याच्या सांस्कृतिक राजधानीला लवकरच भारतीय रेल्वे कडून एक मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातून चौथी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.
पुणे ते खानदेशातील धुळे दरम्यान नवीन वर्षात वंदे भारत एक्सप्रेस धावणार अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या मुंबई सेंट्रल ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्ग सुरू आहे.
तसेच पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावते. म्हणजेच पुण्याला आतापर्यंत तीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.
अशातच आता पुणे ते धुळे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची बातमी समोर आली असल्याने महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी मजबूत होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे.
या भेटीत खासदार शोभा बच्छाव यांनी पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. महत्त्वाची बाब अशी की अश्विनी वैष्णव यांनी बच्छाव यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय होणार अशी ग्वाही दिली आहे.
खासदार शोभा बच्छाव यांनी उपस्थित केलेली मागणी नवीन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिल्याची माहिती खासदार बच्छाव यांनी दिली आहे. अर्थातच, 2025 मध्ये धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसणार आहे.
यामुळे येत्या नवीन वर्षात पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर सध्या देशात एकूण 65 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला देखील 11 वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.