Pune Vande Bharat Train News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला लवकरच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. या गाडीमुळे पुणेकरांचा तीन तासांचा प्रवास आता अवघ्या 55 मिनिटात पूर्ण होणार आहे. या गाडीमुळे पुणे ते सांगली असा तीन तासांचा प्रवास एका तासाहून कमी कालावधीत पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार येत्या 15 सप्टेंबरला देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
झारखंड येथील जमशेदपूर येथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली देशातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे.
ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
सध्या स्थितीला देशातील 55 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. यातील आठ गाड्या आपल्या महाराष्ट्रातून धावतात हे विशेष. दरम्यान आता 15 सप्टेंबरला देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
या दहा गाड्यांमध्ये पुणे ते हुबळी या वंदे भारत ट्रेन चा देखील समावेश राहणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ची संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक?
या गाडीमुळे पुणे ते हुबळी हा प्रवास आठ तासात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. तसेच पुणे ते सांगली हा प्रवास अवघ्या 55 मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक जोडण्याचे काम ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र ते कर्नाटक हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर हुबळीहुन पहाटे पाच वाजता सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्यात दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे, तर पुण्याहून हुबळीला दोन वाजून दहा मिनिटांनी निघणारी वंदे भारत एक्सप्रेस रात्री पावणे अकरा वाजता हुबळीला पोहोचणार आहे.