Pune Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, महाराष्ट्रातील आयटी हब म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जनता वास्तव्याला आली आहे. रोजगार, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा विविध कारणांमुळे पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यातील विविध भागांमधून दररोज पुण्यात हजारोंच्या संख्येने नागरिक दाखल होत असतात आणि हजारोंच्या संख्येने नागरिक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जात असतात. यामध्ये नागपूर आणि विदर्भातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे.
हेच कारण आहे की नागपूर ते विदर्भ दरम्यान सुरू असणाऱ्या बहुतांशी रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. सणासुदीच्या काळामध्ये तर या गाडीमध्ये तिकीट मिळवणे देखील मोठे मुश्किल असते.
हेच कारण आहे की आता पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी उपस्थित केली जात आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे.
ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असून पुणे आणि नागपूरलाही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय. मात्र ही गाडी सध्या स्थितीला चेअरकार प्रकारात उपलब्ध आहे.
अजूनही या गाडीचे स्लीपर व्हर्जन लॉन्च झालेले नाही. मात्र पुढल्या महिन्यात अर्थातच ऑगस्ट महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन लॉन्च होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर पुणे या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
याशिवाय नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याबाबतचाही प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे आता नागपूर विभागाच्या या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे नागपूर सहित संपूर्ण वैदर्भीयांचे लक्ष राहणार आहे.
रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव मान्य केला तर नागपूर मधील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे नागपूर ते पुणे हा प्रवास आरामदायी होणार आहे. सध्या स्थितीला नागपूर ते पुणे असा प्रवास करण्यासाठी गुरुवार वगळता आठवड्यातील सर्वच दिवस एक्सप्रेस गाड्या आहेत.
आठवडाभरात एकूण नऊ गाड्या आहेत. मात्र तरीही प्रवाशांची संख्या पाहता या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. यामुळे जर नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.