Pune Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वाधिक चर्चेतील ट्रेन, या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झाला आहे. सध्या देशात 136 वंदे भारत एक्सप्रेस कार्यान्वित आहेत. देशातील विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे आणि भविष्यात आणखी काही मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होण्याची शक्यता आहे.
अशातच पुण्याला आगामी काळात चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकतात असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या मार्गांवर आगामी काळात वंदे भारत एक्सप्रेस धावणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
नक्कीच या मार्गांवर जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे आज शंकाच नाही. पण खरंच रेल्वेचा असा काही प्लॅन आहे का, रेल्वे बोर्ड याबाबत नेमका काय विचार करत आहे याच संदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
रेल्वे बोर्डाकडे या चार मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे की नाही याच संदर्भातील माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्याला आगामी काळात आणखी चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार का? या चर्चांबाबत भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, भारतीय रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे दावे फेटाळून लावलेत. पुण्याहून नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचा असा कोणताही प्रस्ताव सध्या नाही.
यामुळे अनेकांची निराशा होऊ शकते, परंतु मागणी अशीच कायम राहिल्यास भविष्यात या गाड्यांची घोषणा केली जाऊ शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुण्यातून तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. यातील दोन वंदे भारत एक्सप्रेस गेल्या वर्षी सुरु झाल्या आहेत.
पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या असून या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. तसेच मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन देखील पुणे मार्ग सुरू आहे. म्हणजेच पुण्याला आत्तापर्यंत तीन गाड्यांचा लाभ मिळालेला आहे.