Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पुणेकरांना लवकरच एक मोठे गिफ्ट देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याला आणखी दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
खरंतर ही हाय स्पीड ट्रेन 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यात आले आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास मोठा गतिमान झाला आहे. ही ट्रेन राज्यातील पाच महत्त्वाच्या मार्गावर सुरू आहे.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव या पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सध्या स्थितीला सुरू आहे.
अशातच आता पुण्याला तब्बल दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. म्हणजेच आगामी काही महिन्यात महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सातवर पोहोचणार आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी गाडी पुण्यामार्गे चालवली जात आहे. पण थेट पुण्याहून एकही वंदे भारत एक्सप्रेस सुरू नाहीये.
यामुळे पुणे शहरातून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी अनेकांची मागणी आहे. पुणेकरांच्या माध्यमातून यासाठी मोठा पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान आता पुणेकरांचा हा पाठपुरावा यशस्वी होणार आहे. कारण की पुणे ते हैदराबाद दरम्यान आणि पुणे ते भोपाळ दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी हालचाली वाढवण्यात आल्या आहेत.
सध्या पुणे ते सिकंदराबाद दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस सुरू आहे. मात्र या जनशताब्दीला फुल स्टॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या जागी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे.विशेष म्हणजे या मार्गावर वंदे भारतची ट्रायल रन देखील कम्प्लीट करण्यात आली आहे. याचाच अर्थ आगामी काही दिवसात या दोन शहरादरम्यान ही गाडी सुरू केली जाणार आहे.
याव्यतिरिक्त पुणे ते भोपाळ दरम्यान देखील ही गाडी चालवली जाणार आहे. यासाठी भोपाळमध्ये आवश्यक पूर्वतयारी सुरू झाली आहे. निश्चितच या दोन महत्त्वाच्या मार्गावर जर ही गाडी सुरू झाली तर पुणेकरांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. यामुळे त्यांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.