Pune Vande Bharat Express : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या तीन मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी झेंडा दाखवलाय.
या गाड्या 16 सप्टेंबर पासून रुळावर आल्या असून प्रवाशांना या गाडीचा चांगला फायदा देखील होत आहे. मात्र, काही भागातील प्रवाशांनी पुणे ते हुबळी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत नाराजगी व्यक्त केली आहे.
पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी दोन्ही दिशेने म्हणजेच पुणे ते हुबळी आणि हुबळी ते पुणे अशी आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. उर्वरित तीन दिवस हीच गाडी पुणे ते कोल्हापूर दरम्यान चालवली जाते.
मात्र पुणे ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे अंतर कमी असताना देखील पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिकचे थांबे या गाडीला मंजूर करण्यात आले आहेत. खरे तर, हुबळी-पुणे वंदे भारत धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, सातारा या स्थानकांवर थांबा घेते.
मात्र प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीला घटप्रभा रेल्वे स्थानकावर तसेच रायबाग किंवा कुडची रेल्वे स्थानकावर थांबा मिळायला हवा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू आहे.
लोकसभा खासदार तसेच राज्यसभा खासदारांकडे यासाठी प्रवाशांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून लवकरच या पाठपुराव्याला यश येईल असे दिसते. असे झाल्यास या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना या थांब्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे.
ही गाडी सध्या बेळगाव स्थानकावर थांबत असून यामुळे या स्थानकाशेजारील बैलहोंगल, कित्तूर व खानापुरातील प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र याला एक्स्प्रेस घटप्रभा स्थानकावर थांबली तर याचा फायदा गोकाक, मुडलगी आणि हुक्केरी तालुक्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे.
शिवाय जर रायबाग किंवा कुडची रेल्वे स्थानकावर थांबली तर रायबाग, चिकोडी व अथणीतील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. यामुळे या संबंधित स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. मात्र या संदर्भात सकारात्मक निर्णय होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.