Pune To Solapur Railway : पुणे-सोलापूर रेल्वेमार्गांवरील पुणे ते दौंड दरम्यान सध्या रेल्वे गाड्या 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहेत. तसेच दौंड ते सोलापूर या मार्गावर रेल्वेगाडी 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. पण येत्या 15 दिवसात म्हणजेच नव्या वर्षात दौंड ते सोलापूर दरम्यान 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे गाड्या धावू शकणार आहेत.
पुणे अन सोलापूर ही पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे. पुणे ते सोलापूर दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फार उल्लेखनीय आहे. याचमुळे मध्य रेल्वेने पुणे ते सोलापूर दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी या रेल्वे मार्गाची क्षमता वाढवली जात आहे.
या रेल्वेमार्गांवरील रेल्वे रुळ व इतर पायाभूत सुविधांची कामे केली जात आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे विभागातील पुणे ते दौंड दरम्यानचे रेल्वे रूळ व इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्वीच पूर्ण झाली आहेत आणि यामुळे या मार्गावर ताशी 130 किलोमीटर वेगाने रेल्वे गाड्या धावत आहेत.
दरम्यान, आता सोलापूर विभागातील सोलापूर- दौंड मार्गावरील रेल्वे रूळ व इतर पायाभूत सुविधांची कामे देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ही कामे येत्या काही दिवसात पूर्ण होणार असून आता या मार्गावर देखील रेल्वे गाड्या ताशी 130 किमी वेगाने धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.
येत्या 15 दिवसांत या मार्गावर रेल्वे गाड्या 130 किलोमीटर वेगाने धावू शकतील. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी ही माहिती दिली आहे. पुणे ते दौंड दरम्यान गेल्या एका वर्षापासून रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावत आहेत.
यामुळे पुणे ते दौंड दरम्यान चा प्रवास फारच सुपरफास्ट होतोय. मात्र दौंड ते सोलापूर यादरम्यान रेल्वे रुळ व इतर पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झालेली नसल्याने रेल्वे गाड्यांचा वेग कमी आहे. मात्र येत्या पंधरा दिवसात दौंड ते सोलापूर दरम्यानही रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. यामुळे दौंड ते सोलापूर हा प्रवास देखील वेगवान होणार आहे.
येत्या पंधरा दिवसात म्हणजे जानेवारी 2025 मध्ये संपूर्ण पुणे ते सोलापूर हा प्रवास वेगवान होईल यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दौंड ते सोलापूर दरम्यान चे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सोलापूर हा प्रवास अवघ्या तीन ते साडेतीन तासात पूर्ण होणार असल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.