Pune To Solapur Railway News : पुणे ते सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे पुणे ते सोलापूर हा प्रवास आता वेगवान झाला आहे. या दोन्ही शहरा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यात आला असून यामुळे प्रवाशांचा अर्धा तास वाचेल अशी माहिती रेल्वे विभागाकडून दिली जात आहे. म्हणजेच आता पुणे ते सोलापूर हा प्रवास फक्त आणि फक्त सव्वा तीन तासात पूर्ण होणार आहे.
या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास कालावधी हा 35 ते 40 मिनिटांनी कमी होणार आहे. कारण की या मार्गावर धावणाऱ्या 88 एक्सप्रेस गाड्यांचा वेग हा 110 किलोमीटर प्रति तास यावरून वाढून 130 किलोमीटर प्रतितास एवढा झाला आहे.
सोलापूरहून पुणे, मुंबई तसेच चेन्नई, हैद्राबादसाठी धावणाऱ्या रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून म्हणजे दि. 6 जानेवारीपासून प्रवाशी गाड्या ताशी कमाल 130 किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडी-सोलापूर-दौंड दरम्यानच्या 341.80 किमी अंतराच्या रेल्वे मार्गावर धावणार्या 44 जोडी एलएचबी कोच रेल्वेगाड्यांचा अधिकतम वेग आता 130 किलोमीटर प्रतितास एवढा झाला आहे.
आधी हा वेग ताशी 110 किलोमीटर एवढा होता. खरंतर या मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढावा यासाठी या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अनेक कामे सुरू होती. आता ही कामे पूर्ण झाली आहेत अन यामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग हा 20 किलोमीटर प्रति तास इतका वाढलाय.
म्हणजे आता वाडी ते दौंड दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांचा सरासरी 35 ते 40 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. आता आपण कोण कोणत्या एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे यासंदर्भात माहिती पाहुयात.
या एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्गावर धावणाऱ्या उद्यान, हसन, कोईमतुर, कराईकल, कोणार्क, उद्यान, शताब्दी, सिद्धेश्वर, हुतात्मा, चेन्नई, काकीनाडा, बिकानेर, यशवंतपुर, इंटरसिटी, विशाखापट्टणम, नागरकोईल, काकीनाडा, के. के. यासह अन्य 44 गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. या गाड्यांचा वेग हा ताशी 130 किलोमीटर इतका करण्यात आला आहे.