Pune To Nagpur Special Train : विदर्भासहित उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असलेल्या पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मध्य रेल्वे डिसेंबर महिन्यात एक विशेष गाडी चालवणार आहे.
यामुळे पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे हा प्रवास गतिमान होणार आहे. खरे तर दैनंदिन कामानिमित्त या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने प्रामुख्याने प्रवासी प्रवास करतात.
पण प्रवाशांच्या माध्यमातून रस्त्याने प्रवास करण्याऐवजी रेल्वेने प्रवास करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असतो.
कमी भाड्यामध्ये रेल्वेचा प्रवास होत असल्याने या प्रवासालाच लोक पसंती दाखवात. दरम्यान, पुढल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात येणाऱ्या ख्रिसमस अर्थातच नाताळ सणाला पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हेच कारण आहे की मध्य रेल्वेने या मार्गावर पुढील महिन्यात एक विशेष गाडी चालवण्याचे नियोजन आखले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्टेशन ते नागपूर येथील अजनी रेल्वे स्टेशन दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार आहे.
या गाडीच्या पुणे ते अजनी अशा दोन आणि अजनी ते पुणे अशा दोन फेऱ्या होणार आहेत. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
सेंट्रल रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते अजनी दरम्यान 26 डिसेंबरला आणि 2 जानेवारीला विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी या संबंधित दिवशी पुणे रेल्वे स्थानकावरून 15:15 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 : 50 वाजता नागपुर येथील अजनी रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.
तसेच अजनी ते पुणे दरम्यान 27 डिसेंबरला आणि तीन जानेवारीला विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. या दिवशी ही विशेष गाडी अजनी स्टेशनवरून 19:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11:35 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठे थांबणार बर गाडी ?
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे नाताळ सणानिमित्त चालवली जाणारी ही विशेष गाडी या मार्गावरील दौंड कॉर्डमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
यामुळे या रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. ही गाडी पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष फायदेशीर ठरेल आणि या निमित्ताने प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.