Pune To Kolhapur Railway : पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
विशेषता, पुणे ते कोल्हापूर असा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी फायद्याची राहणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते कोल्हापूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली आहे.
भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. सणासुदीच्या दिवसात आणि उन्हाळीच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मात्र मोठी वाढ होत असते.
दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने पुणे ते कोल्हापूर दरम्यान 31 मार्च 2024 पर्यंत विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरेतर, कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुरू असणारी सह्याद्री एक्सप्रेस कोरोना काळापासून बंद आहे. त्यामुळे कोल्हापूरहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागतोय.
मात्र सह्याद्री एक्सप्रेस बंद असल्याने उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर अतिरिक्त प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता होती आणि याच अनुषंगाने मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर ते पुणे दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला.
31 मार्चपर्यंत ही ट्रेन सुरू राहणार होती. मात्र या ट्रेनला वाढत असणारा प्रतिसाद पाहता आणि पुढील महिन्यात येणारा गुढीपाडव्याचा सण पाहता या विशेष एक्सप्रेस ट्रेनला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय मध्ये रेल्वेने घेतलेला आहे.
यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष एक्सप्रेस ट्रेन आता 31 जून 2024 पर्यंत धावणार आहे.
म्हणजेच या विशेष गाडीला तब्बल 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे ते कोल्हापूर ही विशेष गाडी 1 एप्रिल ते 30 जून पर्यंत चालवली जाईल आणि या कालावधीत या गाडीच्या 91 फेऱ्या होणार आहेत.
तसेच कोल्हापूर ते पुणे ही विशेष गाडी एक एप्रिल ते 30 जून पर्यंत चालवली जाणार असून या कालावधीत या गाडीच्या देखील 91 फेऱ्या होणार आहेत.