Pune To Ayodhya Railway : 5 शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभु श्रीरामांचे भव्य मंदिर तयार झाले आहे. यामुळे संपूर्ण जगभरातील रामभक्तांमध्ये समाधानाचे आणि अतिशय आनंदाचे वातावरण आहे. पाचशे वर्षांनी प्रभू रामरायाचे भव्य मंदिर तयार झाले असल्याने श्रीक्षेत्र अयोध्या येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री क्षेत्र अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्याला येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच वाढली आहे. जगभरातील भाविक प्रभू श्री रामरायाच्या चरणात होण्यासाठी श्रीक्षेत्र अयोध्या नगरीला हजेरी लावत आहेत.
सध्या तर उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू सनातनी धर्मातील लोक आपल्या परिवारासमवेत अयोध्या ट्रीपचे आयोजन करत आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक रामरायांच्या नगरीत जात आहेत.
दरम्यान पुण्याहून श्रीक्षेत्र अयोध्याला जाणाऱ्या भाविकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर पुण्याहून अयोध्याला जाणाऱ्यांची संख्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यामुळे पुणे ते अयोध्या दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही उन्हाळी विशेष गाडी पुणे ते अयोध्या आणि अयोध्या ते पुणे अशी धावणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
पुण्याहून अयोध्याला जाणाऱ्या राम भक्तांची संख्या खूपच अधिक आहे. परंतु या मार्गावर खूपच मोजक्या रेल्वे गाड्या सुरू आहेत. अशा परिस्थितीत उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या रेल्वे गाड्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
परिणामी पुणे ते अयोध्या दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवली गेली पाहिजे अशी मागणी होती. दरम्यान या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पुणे ते अयोध्या अशा 2 आणि अयोध्या ते पुणे 2 अशा चार गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पुणे ते अयोध्या दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत.
याच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर पुणे-अयोध्या उन्हाळी विशेष गाडी (ट्रेन क्रमांक ०१४५५) पुणे रेल्वे स्थानकावरून 3 आणि 7 मे ला सायंकाळी साडेसात वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी ती तिसऱ्या दिवशी प्रभू रामरायांचा नगरीत अर्थातच श्रीक्षेत्र अयोध्या येथे सकाळी ८.५० वाजता पोहोचणार आहे.
तसेच अयोध्या-पुणे (ट्रेन क्रमांक ०१४५६) उन्हाळी विशेष गाडी ही श्री क्षेत्र अयोध्या येथील रेल्वे स्थानकावरून ५ मे आणि ९ मे ला दुपारी ४ वाजता सोडली जाणार असून ही गाडी तिसऱ्या दिवशी पुण्यात दुपारी ३.५५ वाजता पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
या उन्हाळी विशेष गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही ट्रेन चिंचवड, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर आणि लखनौ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे राज्यातील रामभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.