Pune Successful Farmer News : पुणे जिल्ह्यातील शेतकरी शेतीमध्ये कायमच नवनवीन प्रयोग करतात. एकीकडे इतरत्र शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये मात्र पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती मधून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केल आहे.
पुणे जिल्ह्यात शेती क्षेत्रात नेहमीच वेगळेपण पाहायला मिळाले आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सातासमुद्रा पार आपला झेंडा रोवला आहे. केवळ शेती क्षेत्रातच नाही तर शेतीपूरक व्यवसायात देखील पुणे जिल्ह्याचे वेगळेपण नेहमीच वाखान्यजोगे राहिले आहे. दरम्यान जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या मौजे भोंडणी येथील दोन सुशिक्षित तरुणांनी पशुपालन व्यवसायात नवीन प्रयोग सुरु केला आहे.
या शेतकरी बंधूंनी चक्क गीर गाईला ताक पाजून दूध उत्पादन वाढवत पशुपालन व्यवसायातून करोडो रुपयांची उलाढाल करून दाखवली आहे. यामुळे या सुशिक्षित तरुणांचा नवखा प्रयोग सध्या जिल्ह्यात कौतुकाचा विषय सिद्ध होत आहे.
सत्यजित हंगे आणि अजिंक्य हंगे असं या शेतकरी बंधूंचे नाव. या दोन्ही बंधूंनी एमबीए सारखे उच्च शिक्षण घेतले. विशेष म्हणजे शिक्षणानंतर काही काळ विदेशी बँकात नोकरी देखील केली. मात्र मातीशी जुळलेलि असल्याने नोकरीमध्ये काही मन रमेना म्हणून या शेतकरी बंधूंनी नोकरीवर तुळशी पत्र ठेवलं आणि शेती व्यवसाय सुरू केला.
विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गीर गाईंचे संगोपन त्यांनी सुरू केले. विशेष म्हणजे गिर गाईच्या संगोपनात त्यांनी नवनवीन प्रयोग केले आहेत.
यामध्ये त्यांनी गिर गायीचे उत्पादन वाढवण्यासाठी गाईना चक्क ताक पाजला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून गिर गायीच्या दूध उत्पादनात वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. हंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या 100 गिर गाई आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कारणामुळे कांदा दरात वाढ होणार; किती वाढणार भाव, जाणकार लोकांचा अंदाज वाचा…
यापासून हजारो लिटर दुधाचे उत्पादन होते. या दुधापासून ते तूप बनवतात आणि प्रामुख्याने तुपाची विक्री त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांनी उत्पादित केलेले तूप हे देशांतर विक्री होतेच शिवाय परदेशात देखील विकले जात आहे.
यासोबतच हे शेतकरी बंधू लिंबाचे, कैरीचे लोणचे, गुळ, शेवगा पानांची पावडर, खपली गव्हाचे पीठ, हरभरा डाळ, तूर डाळ, गुळ पावडर, डाळिंब अशी उत्पादने अमोरे अर्थ ब्रँडच्या नावाने विकत आहेत. या युवा शेतकरी बंधूंनी टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्मस् नावाची वेबसाइट तयार केली.
या वेबसाइट द्वारे ते पारंपरिक पद्धतीने बनवलेले उच्च प्रतीचे तूप निर्यात करत आहेत. हांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यवसायातून ते तीन कोटीपर्यंतची वार्षिक उलाढाल करत आहेत. विशेष म्हणजे यातून त्यांना 25 लाखांपर्यंतचा निव्वळ नफा मिळत आहे.
हे पण वाचा :- राज्यातील ‘या’ विभागात पुन्हा चार दिवस पावसाचे ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? वाचा…