Pune Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. नानाविध अशा आव्हानांचा सामना करत शेतकरी मात्र वेगवेगळ्या प्रयोगाची कास धरू लागले आहेत. वाईटातून काहीतरी चांगलं घडत असतं या उक्तीप्रमाणे आता शेतकरी बांधव या नैसर्गिक संकटांमुळे नवीन प्रयोग करू लागले आहेत आणि चांगली कमाई करत आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या मौजे भाबवडी येथील सुनील आणि किरण शिवतारे या दोघा भावांनी देखील शेतीमध्ये असाच नवखा प्रयोग केला आहे. खरं पाहता भोर तालुका हा भात उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण भात पिकावर अवलंबून असते. मात्र या दोघा भावांनी भात पिकाला फाटा देत इतर पर्यायी पिकाची शोधा शोध सुरू केली.
हे पण वाचा :- नवी मुंबई, डोंबिवलीवासियांसाठी महत्वाची बातमी; ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग ‘या’ महिन्यात होणार खुला
आणि उन्हाळी हंगामात घेवडा या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या दीड एकर जमिनीत घेवडा या पिकाची लागवड केली. त्यांनी वरून जातीच्या घेवड्याची लागवड केली. शिवतारे बंधूंनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीची पूर्व मशागत केल्यानंतर त्यांनी सपाट वाफे तयार करून घेवड्याची लागवड केली.
60 बाय 30 सेंटिमीटर अंतर ठेवून घेवड्याची लागवड करण्यात आली. एकरी 60 किलो बियाणे म्हणजेच दीड एकरात त्यांना 90 किलो बियाणे लागले. पेरणीच्या वेळी दोन गोणी युरिया आणि सम्राट खताचा बेसल डोस देखील त्यांनी दिला. पेरणीनंतर 16 दिवसांनी विरळणी करण्यात आली.
तसेच फुलधारणांच्या अवस्थेत आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पीपीएम तीव्रतेचे एन डी एम संजीवकाच्या दोन फवारण्या करण्यात आल्या. यानंतर पिकाची निंदणी करण्यात आली आणि या पद्धतीने नियोजन केल्याने घेवड्याचे पीक चांगले बहरले.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकीट बुकिंग बाबत मोठी माहिती ! पहा डिटेल्स
पिकाला आठ ते दहा दिवसांनी पाणी त्यांनी दिले. फुले, शेंगा लागण्याच्या तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी दिल्याची माहिती त्यांनी दिली. या पद्धतीने व्यवस्थापन केल्याने त्यांना भरीव उत्पादन या पिकातून मिळणार आहे. हे पिक आता उत्पादन देण्यास तयार असून दोन ते तीन तोड्यात तीन टन घेवडा उत्पादन त्यांना मिळणार आहे.
सध्या बाजारात 60 रुपये प्रति किलो असा घेवड्याला दर मिळत असून खर्च वजा जाता जवळपास एक लाख रुपयाचा नफा त्यांना दीड एकरातून मिळणार आहे. शिवाय या पिकाच्या शेतीमुळे जमिनीची सुपीकता अबाधित राखले जाते आणि सुपीकता वाढते असा दावा या शिवतारे बंधूंनी केला आहे. निश्चितच उन्हाळी हंगामात घेवडा लागवडीचा हा प्रयोग या शेतकरी बंधूंसाठी फायदेशीर ठरला असून त्यांना यातून लाखोंची कमाई झाली आहे.
हे पण वाचा :- एकदाच ठरलं बाबा….! ‘या’ दिवशी मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकचे उदघाट्न होणार, पहा….