Pune Successful Banana Farming : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये काही बदल केले आहेत. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील असेच काही बदल केले आहेत. परिसरातील शेतकरी सांगतात की येथे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी केळी आणि ऊस पिकाची शेती मोठ्या प्रमाणात होत होती. काळाच्या ओघात मात्र येथील शेतीमध्ये बदल झाला.
केळी आणि उस या बागायती पिकासाठी ओळखला जाणारा हा भाग आता कांदा या नगदी पिकासाठी आणि टोमॅटो तसेच इतर भाजीपालावर्गीय पिकांसाठी विशेष ओळखला जात आहे. येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कांदा आणि टोमॅटो या पिकावरच अवलंबून आहे. मात्र जुन्नर तालुक्यातील उदापूर येथील मच्छिंद्र राव शिंदे यांनी शेतीमध्ये पुन्हा एकदा जुने तेच सोनं याची प्रचिती घडून आणली आहे.
हे पण वाचा :- मुंबईवासियांसाठी खुशखबर ! अखेर मुहूर्त लागला; ‘हा’ महत्त्वाचा रेल्वे मार्ग 15 एप्रिलला होणार सुरू
मच्छिंद्र राव यांनी केळी या पिकाच्या शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. त्यामुळे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी परिसरातील मुख्य पीक असलेली केळीची बाग पुन्हा एकदा परिसरात बहरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे त्यांच्या या प्रयोगाचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. आता जरी जुन्नर व परिसर कांद्याच आगार म्हणून प्रसिद्ध असलं तरी देखील 35 वर्षांपूर्वी या परिसरात केळी हे मुख्य पीक होते.
यामुळे या शेतकऱ्याचा हा जुनाच प्रयोग नवीन काळात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे मत परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. मच्छिंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या तीन एकर जमिनीवर 2012 च्या सुमारास केळीची लागवड केली. लागवडीनंतर या पिकाच्या व्यवस्थापनासाठी त्यांना नानाविध अशा आव्हानाचा सामना करावा लागला. प्रामुख्याने वादळापासून केळीची बाग वाचवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली.
वादळामुळे अनेकदा केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले मात्र हार न मानता त्यांनी केळीची शेती सुरूच ठेवली आणि आजच्या घडीला ते केळीच्या पिकातून लाखोंची कमाई करत आहेत. मच्छिंद्र सांगतात की, त्यांचा केळीचा माल हा थेट बांधावरूनच विक्री होतो. जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव येथील व्यापारी येतात आणि त्यांचा माल खरेदी करतात.
सध्या त्यांच्या केळीला 120 ते 210 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळत असून यातून त्यांना चांगली कमाई होत आहे. एकंदरीत एकेकाळी केळी हे मुख्य पीक असलेल्या आणि आता कांद्याचे आगार म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा केळीची बाग यशस्वीरीत्या फुलवून या प्रयोगशील शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक अस काम केल आहे.
हे पण वाचा :- 15 ऑगस्ट पर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवणार मोदी सरकार! महाराष्ट्राला किती?