Pune Solapur Railway News : पुणे आणि सोलापूरला फेब्रुवारी 2023 मध्ये एक मोठी भेट मिळाली आहे. या दोन्ही शहरांना मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची भेट मध्य रेल्वेने दिली आहे. यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारली आहे.
दरम्यान आता पुणे आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटी अजूनच सुधारणार आहे. पुणे रेल्वे विभागाने आता पुणे-लातूर-पुणे अशी एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यासाठीचा प्रस्ताव पुणे रेल्वे विभागाकडून तयार करण्यात आला आहे.
आता हा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर रेल्वे मुख्यालयाकडून सकारात्मक विचार केला जाणार आहे. एकंदरीत पुणे लातूर पुणे ही गाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे पुणे आणि लातूर या दोन शहरादरम्यान तर कनेक्टिव्हिटी सुधारणारच आहे.
शिवाय या गाडीचा सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवाशांना देखील फायदा होणार आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद मार्गे ही गाडी धावणार असल्याने निश्चितच याचा फायदा सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे. यामुळे पुणे ते सोलापूरचा प्रवास अजूनच गतिमान होईल यात शंका नाही.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस; महाराष्ट्रात तब्बल 120 वंदे भारत ट्रेन तयार होणार, पहा भारतीय रेल्वेचा संपूर्ण प्लॅन
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या पुण्याहून लातूरला जाण्यासाठी एकूण तीन एक्सप्रेस सुरू आहेत. बिदर एक्सप्रेस नांदेड एक्सप्रेस आणि हैदराबाद एक्सप्रेस या तीन ट्रेन सुरू आहेत. यापैकी दोन ट्रेन म्हणजेच बिदर आणि नांदेड एक्सप्रेस रात्रीच्या आहेत.
तसेच हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी सकाळी सुटते. हडपसर टर्मिनसहुन हैदराबाद एक्सप्रेस सकाळी सुटते आणि या गाडीवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. ईतरही गाड्यांमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. यामुळे लातूरवासीयांना पुणे ते लातूर प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करणे असे झाले आहे. यामुळे पुणे ते लातूर स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची मागणी होती.
आता या मागणीचा प्रस्ताव तयार झाला असून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला की पुणे-लातूर एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा मिळणार आहे. वास्तविक याआधी देखील पुणे लातूर अशी स्पेशल गाडी सुरू करण्याची मागणी होती मात्र रेल्वे विभागाकडे रेल्वेचे कोच उपलब्ध नव्हते. यामुळे या मागणीवर फारसा विचारच होत नव्हता. मात्र आता कोच उपलब्ध झाले आहेत यामुळे पुणे रेल्वे विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे.
कसं असेल वेळापत्रक?
काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या गाडीला मंजुरी मिळाली तर पुणे स्थानकातून ही गाडी दररोज सकाळी सात वाजता लातूरकडे रवाना होणार आहे. दुपारी एक वाजता ही गाडी लातूरला पोहचेल. तसेच या गाडीच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर लातूरवरून दुपारी दोन वाजता ही गाडी पुण्याकडे रवाना होणार आहे.
अर्थातच ही गाडी जवळपास सहा तासात पुणे ते लातूर कव्हर करणार आहे. यामुळे पुण्याहून लातूरला आणि लातूरहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या गाडीचा इनडायरेक्ट लाभ सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवाशांना देखील होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी अपडेट ! ही Vande Bharat ट्रेन….