Pune Solapur Railway News : पुणे ते सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी म्हटल्याप्रमाणे येत्या काही दिवसांनी पुणे ते सोलापूर रेल्वे मार्गावर 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे गाड्या धावताना दिसणार आहेत.
यामुळे पुणे ते सोलापूर यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुणे विभागातील पुणे ते दौंड या रेल्वे मार्गावर ताशी 130 किलोमीटरने रेल्वे गाड्या धावत आहेत.
मात्र सोलापूर विभागातील दौंड ते सोलापूर या मार्गावर अजूनही रेल्वे गाड्यांचा वेग 110 किलोमीटर प्रतितास एवढाच आहे. खरे तर, सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी रेल्वे रूळ व इतर पायाभूत सुविधांची कामे केली जात होती.
मात्र आता ही कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कामांची पाहणी नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यांची पाहणी महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी नुकतीच केली आहे. यामुळे सध्या दौंड-सोलापूर दरम्यान ताशी ११० किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या आगामी काळात ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहेत.
सध्या या मार्गावर ताशी 110 किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या धावत असून यामुळे प्रवाशांना अधिकचा वेळ लागतो. पण, पुढील काही दिवसांत सोलापूर विभागातील या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. आगामी काळात मेल, एक्स्प्रेस आणि डेमू यांचा वेग वाढल्याने प्रवासातील वेळ कमी होणार आहे.
जेव्हा दौंड ते सोलापूर दरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगाने रेल्वे धावतील तेव्हा पुणे ते सोलापूर हा प्रवास अवघ्या तीन ते साडेतीन तासात पूर्ण होणार आहे. विशेष बाब अशी की येत्या पंधरा दिवसात दौंड ते सोलापूर दरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकणार आहेत.
त्यामुळे जर तुम्हीही पुणे ते सोलापूर दरम्यान प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी राहणार आहे. पुणे ते सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक असून मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.