Pune-Solapur Bus : पुणे आणि सोलापूरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर ही दोन्ही शहरे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. पुणे ते सोलापूर दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान या मार्गावरील बस प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे या मार्गावर लवकरच इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार आहे. खरतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी महामंडळाला नवीन उभारी देण्यासाठी आणि तोट्यात चाललेले महामंडळ फायद्यात यावे यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यभरातील विविध मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली जात आहे. अशातच आता पुणे ते सोलापूर दरम्यान देखील इलेक्ट्रिक बस चालवली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभाग या मार्गावर 15 ऑगस्ट पासून इलेक्ट्रिक बस चालू करणार असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. याबाबत राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनची उभारणी पूर्ण झाली आहे.
विशेष बाब अशी की या चार्जिंग स्टेशनचे ट्रायल देखील महावितरणच्या माध्यमातून नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान आता सोलापूर विभागाच्या माध्यमातून कंपनीकडे दहा इलेक्ट्रिक बस गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गाड्या 14 ऑगस्टपूर्वीच सोलापूर विभागाला उपलब्ध होतील अशी आशा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे जर गाड्या वेळेत उपलब्ध झाल्यात तर 15 ऑगस्टचे अर्थात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून याच राष्ट्रीय सणाच्या दिवशी या मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार अशी माहिती सोलापूर विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र जर वेळेत बस उपलब्ध झाली नाही तर ऑगस्ट अखेरपर्यंत या मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार अशीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला देण्यात आली आहे.
निश्चितच या मार्गावर जर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाले तर पुणे ते सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना आणि महिलांना होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना आणि महिलांना एसटीने प्रवास करण्यासाठी तिकीट दरात 50 टक्के एवढी सवलत दिली जात आहे. म्हणून या प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या नव्या एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे.