Pune Second Vande Bharat Train : सध्या वंदे भारत ट्रेनचा मोठा बोलबाला आहे. लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वंदे भारतने प्रवास करायचा आहे. यां ट्रेनची वाढती लोकप्रियता पाहता शासनाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या रूटवर ही ट्रेन सुरू केली जात आहे. आगामी वर्षात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्याने वंदे भारत ट्रेन देशातील महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जोरात प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात दोन वंदे भारत गाड्या सुरू करण्यात आल्या. आता येत्या काही महिन्यात महाराष्ट्राला आणखी वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे नुकतीच मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात झाली आहे. ही एक्सप्रेस पुणे मार्गे धावत आहे. यामुळे पुणेकरांचा मुंबई आणि सोलापूरकडील प्रवास सोयीचा झाला आहे.
मात्र असे असले तरी राज्याची सांस्कृतिक राजधानी, देशातील शिक्षणासाठी एक महत्वाचं स्थान, शिक्षणाचे माहेरघर म्हणून नावलौकिक असंलेल्या पुणे शहरातून अद्याप एकही थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू नाही. पण आता ही अडचण लवकरच दूर होणार आहे. पुणे शहराहून थेट एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पुणे ते सिकंदराबाद यादरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा हैदराबाद कडील प्रवास आणखी जलद, गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
या वंदे भारत ट्रेन मुळे पुणे रेल्वे स्टेशन वरून थेट वंदे भारत एक्सप्रेस दुसऱ्या शहरादरम्यान धावणार आहे. निश्चितच यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला मिळणारी पसंती पाहता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून पुणे ते सिकंदराबाद दरम्यान लवकरच ही वंदे भारत गाडी सुरू केली जाणार आहे.