Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे शहरासह संपूर्ण राज्यात रस्ते विकासाचे कामे जोमात सुरु आहेत. कोणत्याही शहरातील, राज्यातील आणि प्रदेशातील विकासात त्या भागातील रस्ते व्यवस्था मोलाची भूमिका निभावत असते. अशा परिस्थितीत शासनाकडून राज्यभरात रस्त्यांची जाळे तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये देखील वेगवेगळी रस्त्याची कामे केली जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोडचे देखील काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे.
दरम्यान आता या रिंग रोडच्या कामाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोड, जालना ते नांदेड महामार्ग आणि मल्टी मॉडेल कॉरिडॉर या तीन प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली अंतिम निविदा काढण्यापूर्वी पात्रता पूर्व निविदा प्रसिद्ध केली आहे. या तीन प्रकल्पांसाठीची जवळपास 45 हजार कोटी रुपयांची ही पूर्वनिविदा प्रसिद्ध झाली आहे. यामुळे आता पुणे रिंग रोड सहित या दोन कामांना देखील लवकरच सुरुवात होईल आणि प्रत्यक्ष बांधकाम या प्रकल्पाचे सुरु होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात आता लवकरच निओ मेट्रो धावणार; असा राहणार संपूर्ण प्रकल्प, पहा रूटमॅप
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पुणे रिंग रोड चे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प 168 किलोमीटर लांबीचा आहे. याचे काम एकूण दोन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात या रोडचे काम होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने याचे काम जलद करण्यासाठी नियोजन आखले असून यासाठी आवश्यक भूसंपादनाचे काम देखील आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
हा रोड पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष सहाय्यक असून यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला देखील नवसंजीवनी प्राप्त होईल असा दावा शासनाच्या, प्रशासनाच्या आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जात आहे. हा रस्ता पुरंदर, भोर, मावळ, मुळशी, खेड या पाच तालुक्यांमधून जाणार असून या प्रकल्पासाठी जवळपास 27 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- 14वी वंदे भारत ट्रेन आज सुरु होणार; कोणती महत्वाची शहरे होणार कनेक्ट, मुंबई-गोवा वंदे भारतला मुहूर्त केव्हा? पहा डिटेल्स
यामध्ये केवळ भूसंपादनासाठीच 12000 कोटी रुपये जाणार आहेत. बांधकामासाठी 15 हजार कोटी लागतील असा एक अंदाज आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे रिंगरोडमधील आणि पुणे-औरंगाबाद ग्रीनफिल्ड महामार्ग 31 किलोमीटर पर्यंत एकत्र येतो. म्हणजे ३१ किलोमीटर लांबीचा भाग सामाईक असल्याने हा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या माध्यमातून विकसित करण्याचे ठरले आहे. यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाचा पैसा वाचणार आहे.
अर्थातच 168 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे केवळ 137 किलोमीटर लांबीचेच काम रस्ते विकास महामंडळाला या ठिकाणी करावे लागणार आहे आणि उर्वरित काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे. एकंदरीत पुणे रिंग रोडसह अन्य दोन महामार्गांच्या कामासाठी आवश्यक पूर्वनिविदा नुकत्याच प्रसिद्ध झाल्या असल्याने रिंग रोडचे काम जलद गतीने आता मार्गी लागेल आणि यामुळे पुणेकरांचे आणि पिंपरी चिंचवड वासियांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल अन हे दोन्ही शहर वाहतूक कोंडी मुक्त होतील असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी फक्त 17 लाखात घर मिळणार, पहा…..