Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोणती फोडण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम केले जात आहे. दरम्यान आता या प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. खरं पाहता न्यायालयाचे एका निर्णयामुळे आता या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन भूसंपादनासाठी नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत.
यानुसार आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नव्याने फेर मूल्यांकन केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे फेर मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. यात या प्रकल्पामध्ये बाधित दोन गावात फिर मूल्यांकनाची प्रक्रिया करण्यात आली असून यातून या प्रकल्पामध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी तसेच जमीनदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
हे पण वाचा :- पुणे, मुंबई, कोल्हापूरवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन लवकरच होणार सुरु, रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा, पहा…
खरं पाहता नव्याने फेर मूल्यांकन केले असता बाधित शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळण्याची शक्यता तयार होत आहे. मात्र असे असले तरी या नव्याने केल्या जाणाऱ्या फेर मूल्यांकनाच्या प्रक्रियेमुळे या प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच काम लांबणीवर पडणार असले तरी देखील या पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला यामुळे मिळणार आहे.
म्हणून बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाचा हा निर्णय फायद्याचा ठरू लागला आहे. वास्तविक, प्रशासनाकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पाचे मूल्यांकन, दर निश्चित करताना नोटिफिकेशन निघालेल्या वर्षांच्या लगतच्या तीन वर्षांतील जमीन खरेदी-विक्रीचे दर निश्चित धरून जास्तीत जास्त दर प्रकल्पामध्ये बाधित जमीनदारांना देण्याचा प्रयत्न असतो. पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना देखील याच पद्धतीने जमिनीसाठी मोबदला दिला जात होता.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने लोकलबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता Mumbai Local चा प्रवास होणार सुसाट, पहा…..
मात्र आता लगतचे वर्ष सोडून नंतरच्या तीन वर्षांतील दर गृहीत धरण्यात येणार असल्याने पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, रिंगरोडसाठी मूल्यांकन करताना दोन्ही वर्षे कोरोना काळातील आल्याने या कालावधीत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी झाले होते. साहजिकच याचा परिणाम दर निश्चित करताना झाला आणि पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळण्याची शक्यता होती.
मात्र तरी देखील प्रशासनाने निश्चित केलेल्या दरावर पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकरी आणि जमीनदार खूष होते. मात्र आता शासनाने काढलेल्या नवीन नियमानुसार अन आदेशानुसार पुणे रिंग रोड मध्ये बाधित शेतकऱ्यांना अधिकचे दर मिळणार असल्याचे चित्र आहे. मात्र प्रकल्पाच्या कामाला यामुळे उशीर होईल एवढे नक्की.