Pune Railway Update : सध्या संपूर्ण देशात सणासुदीचा काळ सुरू आहे. गेल्या महिन्यात देशात गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. सध्या नवरात्र उत्सवाचा सण सुरू आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत अर्थातच विजयादशमीच्या दिवसापर्यंत संपूर्ण देशात नवरात्र उत्सव आनंदात साजरा केला जाणार आहे. यानंतर मग दिवाळी सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात सेलिब्रेट होणार आहे.
या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मात्र गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य रेल्वेने याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाचा आणि अगदी कौतुकास्पद असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुणे आणि अमरावती शहरातील तसेच जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचा राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने सणासुदीच्या काळात पुणे-अमरावती दरम्यान एकूण आठ मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे या संबंधित मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, आता आपण या विशेष गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
पुणे-अमरावती मेमू ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल?
मध्य रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे-अमरावती मेमू ट्रेन 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही एक द्विसाप्ताहिक ट्रेन राहणार असून दर गुरुवारी आणि सोमवारी ही गाडी पुणे येथून सकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी अमरावतीला पोहोचेल.
तसेच अमरावती-पुणे मेमू ट्रेन 5 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी दर रविवारी आणि बुधवारी दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी अमरावती येथून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पुणे रेल्वे स्थानकावर दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.
पुणे-अमरावती मेमू ट्रेनला कुठे थांबे मिळणार ?
मध्य रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.