Pune Railway : आजपासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. आता दिवाळी मात्र बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे. 12 नोव्हेंबर पासून यंदा दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान यावर्षी दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळातच पुणे, अमरावती आणि नाशिक मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे रेल्वे विभागाने पुण्यातून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या एक्सप्रेस ट्रेनच्या रूटमध्ये मोठा बदल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाने पुणे ते भुसावळ दरम्यान धावणारी हुतात्मा एक्सप्रेस आता पुणे ते अमरावती दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमरावतीसहित संपूर्ण विदर्भातून दररोज पुण्यात येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
पुणे ते अमरावती आणि अमरावती ते पुणे असा रेल्वे मार्ग प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे विभागाच्या माध्यमातून पुणे ते भुसावल दरम्यान चालवली जाणारी हुतात्मा एक्सप्रेस पुणे ते अमरावती दरम्यान चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे नाशिक शहरातील रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
कारण की पुणे ते भुसावळ दरम्यान धावणारी हुतात्मा एक्सप्रेस ही नाशिक मार्गे चालवली जात होती. पण ही हुतात्मा एक्सप्रेस आता अमरावतीपर्यंत चालवली जाणार असून ही गाडी आता नाशिकमार्गे धावणार नाहीये. यामुळे नासिककरांचा पुण्याकडील प्रवास आता आणखी कठीण होणार आहे. आधीच नासिक ते पुणे थेट रेल्वे मार्ग नसल्याने नाशिककरांना पुण्याकडील प्रवास करताना खूपच अडचण सहन करावी लागते.
अशातच आता नासिकमार्गे धावणारी पुणे ते भुसावळ दरम्यानची हुतात्मा एक्सप्रेस अमरावती पर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे नासिककरांचा मोठा हिरमोड झाला आहे. परंतु ही हुतात्मा एक्सप्रेस आता अमरावती पर्यंत धावणार असल्याने अमरावतीसहित विदर्भातील रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या मार्गे अमरावतीला पोहोचणार
नाशिकमार्गे पुणे ते भुसावळ दरम्यान धावणारी हुतात्मा एक्सप्रेस आता थेट अमरावती पर्यंत चालवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता ही गाडी दौंड, अहमदनगर, मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत धावणार आहे.
ही गाडी पुण्यातील उरळी येथून दौंड कोरड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याचे रेल्वे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.