Pune Railway News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी दौंड ते पुणे असा प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी दिलासादायी ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौंड ते हडपसर पर्यंत धावणारी डेमू ट्रेन आता थेट पुण्यापर्यंत चालवली जाणार आहे.
खरंतर ही ट्रेन दौंड ते हडपसर अशी चालवली जात होती म्हणून विद्यार्थी अन नोकरदार वर्गाला पुढे पुण्याला जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे.
यामुळे ही गाडी थेट पुण्यापर्यंत चालवावी अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केली जात होती. अखेर कार प्रवाशांची ही मागणी आता पूर्ण करण्यात आली आहे.
रेल्वेने दौंड ते हडपसर पर्यंत धावणारी गाडी पुण्यापर्यंत चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्थानिक आमदार राहुल कुल यांनीच या संदर्भात माहिती दिलेली आहे.
यामुळे प्रवाशांची निश्चितच मोठी सोय होणार आहे. यावेळी आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले आहेत.
एवढेच नाही तर दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश पुणे रेल्वे भागात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यानेही तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आहेत.
एकंदरीत आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे दौंड ते मुंढवा अर्थातच हडपसर पर्यंत धावणारी ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार आहे.
त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या असंख्य महिला, विद्यार्थी, चाकरमानी आणि व्यवसायिकांना या ट्रेनचा फायदा होणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा आणि आमदार राहुल कुल यांनी केलेल्या पाठपुराव्याचा निश्चितच या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.