Pune Railway News : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे. खरे तर लवकरच होळी आणि धुलीवंदनाचा सण येणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आनंदाचे वातावरण आहे. होळीच्या सणाला अनेक जण गावाकडे परतणार आहेत.
पुण्यातून गावाकडे जाणाऱ्यांची संख्या देखील नेहमीप्रमाणेच अधिक राहिल असा अंदाज आहे. दरम्यान पुण्यातून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीच रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरून आजपासून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन कोपरगाव अन नगर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासन आणि पुणे ते संबलपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला असून ही गाडी कोपरगाव आणि नगर रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे.
ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ रेल्वे स्थानकावरून देखील जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी देखील माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबलपूर – पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन 17 ते 31 मार्च 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत दर रविवारी संबळपूर येथून रात्री १० वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पुणे येथे पहाटे पावणे तीन वाजता पोहोचणार आहे.
तसेच, पुणे-संबलपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन 19 मार्च ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी पुणे येथून सकाळी सव्वानऊ वाजता सोडली जाईल आणि दुसऱ्या दिवशी संबलपूरला दीड वाजता पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा असणार?
ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असा प्रवाशांचा प्रश्न होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ़, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, लाखोली, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, नगर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही विशेष एक्सप्रेस ट्रेन थांबणार आहे.
पुणे ते संबंलपूर आणि संबंलपूर ते पुणे या दोन्ही अप आणि डाऊन मार्गावरील विशेष एक्सप्रेस ट्रेनला या सदर रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.