Pune Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही पुणेकर असाल आणि रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. खरंतर, येत्या काही दिवसात होळी आणि धुलीवंदनाचा मोठा सण येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे या सणाला पुन्हा एकदा रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. होळी आणि धुलीवंदन साजरा करण्यासाठी अनेक जण पुण्यातून गावाकडे जाणार आहेत.
अशा परिस्थितीत या अशा नागरिकांसाठी अन आगामी काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने पुण्यातून गावाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्सप्रेस ट्रेन पुणे ते संबलपूर दरम्यान चालवली जाणार असून ही गाडी उत्तर महाराष्ट्रातील नगर व खानदेशमधून धावणार आहे.
यामुळे ही ट्रेन खानदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी देखील मोठी फायद्याची ठरणार आहे. पुणे, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी ही ट्रेन खूपच फायद्याची ठरणार आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण या ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 17 ते 31 मार्च दरम्यान संबळपूर- पुणे विशेष गाडी चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी दर रविवारी संबळपूर येथून रात्री १० वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पुणे येथे पहाटे २.४५ वाजता पोहोचणार आहे.
तसेच पुणे-संबळपूर ही विशेष गाडी १९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी या काळात दर मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ९.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी संबळपूर येथे दुपारी दिड वाजता पोहोचणार आहे. या गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या विशेष ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ़, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, लाखोली, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, नगर या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.