Pune Railway News : पुणे, सांगली, सातारासहित पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी कामाची अन अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. आगामी होळी आणि धुलीवंदनाच्या सणासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने होळी सणाच्या निमित्ताने विविध रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी होळी सणासाठी विविध रेल्वे मार्गावर अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे.
यामुळे ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन काही विशेष गाड्या चालवणार अशी माहिती समोर येत आहे. यात हुबळी ते अहमदाबाद या मार्गावर देखील विशेष गाडी चालवण्याचे नियोजन रेल्वेने आपले आहे.
विशेष म्हणजे ही गाडी मिरज सांगली सातारा पुणे मार्गे धावणार आहे. यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
सणासुदीच्या काळातही रेल्वे प्रवाशांना या विशेष गाडीमुळे जलद प्रवास करता येईल अशी आशा आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार विशेष गाडीवेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी हुबळी रेल्वे स्थानकावरून 24 तारखेला सायंकाळी साडेसात वाजता सुटणार आहे आणि पुण्याला 25 तारखेला सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच अहमदाबादला सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून 25 मार्चला रात्री नऊ वाजून 25 मिनिटांनी सुटणार आहे.
तसेच 26 मार्चला ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी दाखल होईल अन पुढे सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी हुबळी रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी या मार्गावरील धारवाड, लोंडा, बेळगावी, घटप्रभा, मिरज, सांगली, सातारा, पुणे, कल्याण, वसई रोड, बोईसर, वापी, सुरत, वडोदरा आणि आणंद या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
परिणामी या सदर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा मिळणार आहे. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात देखील जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.