Pune Railway News : पुणे आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर देशात रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. देशातील रेल्वे प्रवाशांची संख्या ही खूपच अधिक आहे.
दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. दरम्यान पुणे आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रेल्वे प्रशासनाने काही दुरुस्तीच्या कामांसाठी पुण्याहून सुटणारी एक महत्त्वाची एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व रेल्वेने चक्रधरपूर विभागातील राउरकेला स्थानकातील यार्ड इंटरलॉकिंगच्या कामासाठी हटिया-पुणे-हटिया या एक्सप्रेस ट्रेनच्या दोन्ही बाजूची एक-एक फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे हटीयाहुन पुणे आणि पुण्याहून हटिया प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना थोडासा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ही ट्रेन अकोला मार्गे जात असल्याने याचा विदर्भातील प्रवाशांना देखील फटकाच बसणार आहे. ऐन सणासुदीच्या हंगामातच ही ट्रेन रद्द राहणार असल्याने प्रवाशांमध्ये थोडीशी नाराजी देखील पाहायला मिळत आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने ९ ऑक्टोबरला हटिया येथून सुटणारी हटिया-पुणे एक्सप्रेस अर्थातच गाडी क्र. २२८४६ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर ही गाडी अकोला मार्गे धावते. म्हणून 9 ऑक्टोबरला ही गाडी रद्द झाली असल्याने मंगळवारी दुपारी २.४० वाजता ही गाडी अकोला स्थानकावर येणार नाही.
यामुळे अकोला येथील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच गाडी क्र. २२८४५ पुणे-हटिया एक्सप्रेस ११ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकावरूनही सुटणार नाहीये. यामुळे पुण्याहून विदर्भाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र तदनंतर ही गाडी पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होणार आहे.