Pune Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. कमी वेळेत सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात प्रवास होत असल्याने रेल्वे प्रवाशाला कायमच पसंती दाखवली जाते.
अशातच पुणे विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुण्याहून सुटणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव भुसावळ विभागात रेल्वेचा तिसरा मार्ग आणि यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान रेल्वे कडून मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
या मेगाब्लॉकमुळे पुणे विभागातील नऊ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि दहा रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल झाला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे.
ऐन सुट्टीच्या दिवसांमध्ये रेल्वे कडून घेण्यात आलेला हा मेगा ब्लॉक निश्चितच प्रवाशांसाठी त्रासदायक सिद्ध होणार आहे. दरम्यान आज आपण या मेगा ब्लॉक मुळे कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या गाड्या रद्द होणार ?
रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजे 12 ऑगस्ट रोजी आणि 14 ऑगस्ट रोजी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द रद्द करण्यात आली आहे.
तसेच उद्या म्हणजे दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर- पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर-पुणे एक्सप्रेस रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे.
तसेच 14 ऑगस्ट 2023 रोजी पुणे-नागपूर, पुणे-जबलपूर, नागपूर-पुणे, गोंदिया-कोल्हापूर एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला पुणे-नागपूर एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.
16 ऑगस्ट 2023 ला सुटणारी गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.