Pune Railway News : भारतात प्रवासासाठी रेल्वे हे एक प्रमुख साधन आहे. देशात रेल्वे प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. कमी दरात आणि जलद प्रवास होत असल्याने प्रवाशांच्या माध्यमातून नेहमीच रेल्वे प्रवासाला पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे भारताचे रेल्वे नेटवर्क हे अगदी कानाकोपऱ्यात विस्तारले आहे.
त्यामुळे देशातील कोणत्याही शहरात प्रवास करायचा असला तर सर्वप्रथम रेल्वेलाच पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वे देखील प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित व्हावा यासाठी वेगवेगळे निर्णय घेत आहे.
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद बाबा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या वेगवान गाड्या चालवल्या जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची गाडी 2019 मध्ये सुरू झाली आहे.
आतापर्यंत देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरु झाले असून येत्या काही महिन्यांमध्ये आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे. याव्यतिरिक्त इतरही अन्य महत्त्वाचे निर्णय रेल्वेकडून घेतले जात आहेत.
दरम्यान सातारा ते पुणे हा प्रवास जलद बनवण्यासाठी देखील रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरंतर सातारा ते पुणे आणि पुणे ते सातारा हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या उपदिक आहे. ही दोन्ही शहरे पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाची शहरे आहेत.
यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद व्हावा आणि या मार्गावरील प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभवता यावा यासाठी रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता या मार्गाच्या रेल्वेचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण केले जात आहे.
विशेष म्हणजे शिंदवणे ते आंबळे हा भाग वगळता या संपूर्ण मार्गाचे रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम देखील पूर्ण झाले आहे. यामुळे आता या रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान झाला आहे. आता या रेल्वे मार्गावरील गाड्या क्रॉसिंग साठी थांबत नसून यामुळे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक वेगवान बनला आहे.
याचा परिणाम म्हणून लोणंद ते पुणे हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होत आहे. तसेच, लोणंद ते पुणे या प्रवासासाठी आता फक्त पन्नास रुपये तिकीट दर लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले जात आहे.
पुणे ते लोणंद रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कस आहे ?
सध्या लोणंद येथून पुण्याला जाण्यासाठी पहाटे 5 वाजता कोल्हापूर-पुणे एक्सप्रेस (पूर्वीची सह्याद्री एक्सप्रेस), सात वाजून 30 मिनिटांनी कोल्हापूर डेमू एक्सप्रेस, 10 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूर डेमू एक्सप्रेस, एक वाजून पंधरा मिनिटांनी कोयना एक्सप्रेस, दर मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता मिरज पुणे डेमू, सायंकाळी 7:20 वाजता फलटण पुणे एक्सप्रेस, सायंकाळी 7:45 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वे गाड्या धावत आहेत.
याशिवाय पुणे येथून लोणंदला जाण्यासाठी पहाटे ४.२० ला महाराष्ट्र एक्स्प्रेस, रविवार वगळता ६.१० ला पुणे- फलटण डेमू एक्स्प्रेस, सकाळी १०.४० ला पुणे कोल्हापूर एक्सप्रेस, १२.४० ला कोयना एक्स्प्रेस, ६.३० ला पुणे – सातारा डेमू, दर मंगळवारी सकाळी आठ वाजता पुणे- मिरज एक्स्प्रेस, 9:45 वाजता पुणे कोल्हापूर एक्सप्रेस ( पूर्वीची सह्याद्री एक्सप्रेस) या रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.