Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आहे. खरं तर दिवाळीच्या काळात नेहमीच रेल्वेमध्ये गर्दी होत असते.
सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेत गर्दी वाढते. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सणासुदीच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट मिळत नाही. परिणामी प्रवाशांना बसने किंवा इतर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो.
त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते. दरम्यान यंदाही दिवाळीच्या काळात रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांसाठी काही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे. पुण्यावरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी पाहता पुणे ते अमरावती या मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर अमरावतीसह विदर्भातील अनेक नागरिक कामानिमित्त, व्यवसायानिमित्त तसेच शिक्षणानिमित्त पुण्यातच स्थायिक झाले आहेत.
दरम्यान याच नागरिकांसाठी रेल्वे विभागाने पुणे ते अमरावती दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आज पासून अर्थातच १० नोव्हेंबर पासून चालवली जाणार आहे.
ही एक विशेष एक्सप्रेस ट्रेन राहणार आहे. अर्थातच ही गाडी नियमित धावणार नाही. ही गाडी 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालवली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 10 नोव्हेंबर ते 11 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 11 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून निघेल आणि मध्यरात्री 00.55 ला अमरावतीला पोहचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी अमरावतीवरून रात्री 10:50 ला निघेल आणि सकाळी 11:25 वाजता पुण्याला पोहचणार अशी माहिती समोर आली आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते अमरावती दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस गाडी उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर,कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.