Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. ती म्हणजे आगामी पोलिसांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुण्याहून दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने पुणे ते कानपूर आणि पुणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे.
खरे तर होळीच्या सणाला रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. होळी सणाला दरवर्षी रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. अशा परिस्थितीत, दरवर्षी मध्ये रेल्वेच्या माध्यमातून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात असतात.
यंदाही मध्य रेल्वेने पुणे ते कानपूर आणि पुणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.पुणे-कानपुर-पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक? मिळालेल्या माहितीनुसार पुणे-कानपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन 20 आणि 27 मार्च रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
ही ट्रेन पुणे स्थानकावरून सकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी कानपूर स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच कानपूर पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन कानपूर रेल्वे स्थानकावरून 21 मार्च आणि 28 मार्चला सोडली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी आठ वाजून पन्नास मिनिटांनी कानपुर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि बारा वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठे थांबणार पुणे-कानपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील दौंड, चोरड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मरमदुके, भुसावळ, खंडवा, इटारसी, बीना, वीरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन, उरई, राणी कमलापती या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
पुणे-सावंतवाडी-पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सावंतवाडी विशेष एक्सप्रेस ट्रेन 8, 15, 22 आणि 29 मार्चला पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी 23 : 30 वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच सावंतवाडी-पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन 10, 17, 24 आणि 31 मार्चला सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून 23 : 25 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे.
पुणे-सावंतवाडी-पुणे कुठे थांबणार
सेंट्रल रेल्वेने पुणे-सावंतवाडी विशेष एक्सप्रेस ट्रेन बाबत दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी अप आणि डाऊन मार्गावर प्रवास करताना कल्याण, लोणावळा, पनवेल रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली आणि कुडाळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.