Pune Railway News : नुकताच दिवाळीचा मोठा सण साजरा करण्यात आला आहे. दिवाळीच्या सणाला मुंबई पुण्यासारख्या शहरात कामानिमित्त वसलेले नागरिक आपल्या गावाकडे आले होते. मात्र आता पुन्हा एकदा या चाकरमान्यांची आपल्या कर्मभूमीकडे धाव सुरू झाली आहे.
आपली कर्मभूमी लवकरात लवकर गाठून कामावर रुजू होण्याचा प्रयत्न चाकरमान्यांकडून केला जात आहे. यासाठी मात्र चाकरमान्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लोकांना परत शहरात जाण्यासाठी, परतीच्या प्रवासासाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याचे भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. विशेषतः रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे नाईलाज म्हणून अनेक लोकांना खाजगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करावा लागत आहे. परंतु खाजगी गाड्यांचा प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावत आहे.
यामुळे यंदाची दिवाळी आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेचे दिवाळ काढणार की काय? असे बोलले जात आहे.
तथापि, नागरिकांची होणारी ही होरपळ पाहता आता मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. हा निर्णय नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरणार आहे.
कारण की मध्य रेल्वेने नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी एकेरी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही गाडी आजपासून 19 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली आहे.
यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कसं असेल वेळापत्रक ?
हाती आलेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे सुपरफास्ट एकेरी स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01166) ही गाडी रात्री 21.30 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 14.40 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
ही विशेष ट्रेन अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, अंकाई, कोपरगाव, अहमदनगर, बेलापूर, दौंड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे. निश्चितच या गाडीमुळे नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.