Pune Railway News : सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर सणासुदीचा हंगाम आहे. दरवर्षी सणासुदीच्या हंगामात देशातील रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून दरवर्षी अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवल्या जातात.
मध्य रेल्वे प्रशासन दरवर्षी विशेष गाड्या सोडत असते. यावर्षीही मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावरून काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे पुणे ते सावंतवाडी रोड विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण पुणे ते सावंतवाडी रोड विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणाऱ यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सावंतवाडी रोड स्पेशल (गाडी क्रमांक 01175) ही गाडी 22.10.2024 ते 12.11.2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
या काळात ही गाडी प्रत्येक मंगळवारी नऊ वाजून 35 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरून निघणार आहे आणि त्याच दिवशी 22.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे.
तसेच, सावंतवाडी रोड-पुणे स्पेशल 23.10.2024 ते 13.11.2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. या विशेष गाडीच्या 4 फेऱ्या होणार आहेत.
या काळात ही गाडी दर बुधवारी सावंतवाडी रोडवरून 23.25 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 12.15 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
कुठं थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन?
ही विशेष गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.