Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे विभागाने पुण्यावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. पुणे ते मऊ दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार, या गाडीचे वेळापत्रक नेमके कसे राहणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ते मऊ दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही स्पेशल ट्रेन पुण्याहून दि. ८, १६, २४ जानेवारी व दि. ६, ८ फेब्रुवारीला सकाळी १०.१० वाजता निघेल आणि पुढच्या दिवशी २२:०० वाजता पोहोचणार आहे.
तसेच मऊ ते पुणे कुंभमेळा विशेष गाडी मऊ येथून दि. ९, १७,२५ जानेवारी व दि. ७, ९ फेब्रुवारी रोजी रात्री २३.५० वाजता मऊ रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे अन ही ट्रेन तिसऱ्या दिवशी १५.४५ वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की, या गाडीला या मार्गावरील जवळपास 25 रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर देखील थांबा घेणार आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना देखील या गाडीचा फायदा होणार आहे.
पुणे समवेत अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी फायद्याची ठरेल असा विश्वास व्यक्त होतोय. आता आपण ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार!
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या मार्गावरील दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवडिया, छनेरा , खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड या 25 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील मनमाड जळगाव भुसावळ या ठिकाणीही ही गाडी थांबणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी देखील ही गाडी फायद्याचे राहणार आहे. पुणे, अहिल्यानगर, मनमाड तसेच जळगाव या भागातील लोकांना प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी जाणे या गाडीमुळे सोयीचे होणार आहे.