Pune Railway News : येत्या काही दिवसात होळी आणि धुलीवंदनाचा सण सुरु होणार आहे. होळीच्या आणि धुलीवंदनाच्या सणाला मोठ्या प्रमाणात शहरात राहणारी नोकरदार मंडळी आपल्या गावाकडे परतणार आहे. पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात नोकरदार मंडळी होळी आणि धुलीवंदनाच्या सणासाठी आपल्या गावाला जाणार आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे ते दानापूर आणि पुणे ते गोरखपूर यादरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
दरम्यान, आज आपण या 2 विशेष एक्सप्रेस ट्रेनची टाइमिंग अर्थातच वेळापत्रक सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच या विशेष एक्सप्रेस गाड्या या मार्गावरील कोणकोणत्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत.
पुणे ते दानापुर दरम्यानच्या एक्सप्रेसचे वेळापत्रक कस राहणार ?
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्चला पुणे- दानापूर सुपरफास्ट विशेष गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी साडेसहा वाजता सोडली जाणार आहे आणि ही विशेष गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता दानापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी २२ मार्चला दुपारी दीड वाजता दानापूर रेल्वे स्थानकावरून ही गाडी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री पावणे आठ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
पुणे-दानापूर विशेष एक्सप्रेसला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार
या गाडीला सदर मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केलेला आहे. या गाडीला राज्यातील हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
पुणे- गोरखपूर दरम्यानच्या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार ?
पुणे ते उत्तर प्रदेश मधील गोरखपुर रेल्वे स्थानकादरम्यान होळी सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही विशेष गाडी 22 मार्च 2024 ला पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी सायंकाळी सव्वाचार वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता युपी मधील गोरखपूरला पोहोचेल अशी माहिती समोर आली आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी २३ मार्चला गोरखपूर येथून सोडली जाणार आहे. ही गाडी गोरखपुर रेल्वे स्थानकावरून ११.२५ वाजता सुटणार आहे आणि २५ मार्चला सकाळी ६.२५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
पुणे-गोरखपूर विशेष गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा ?
ही गाडी राज्यातील दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती हाती आली आहे.