Pune Railway News : भारतात सर्वाधिक रेल्वे वाहतुकीचा वापर होतो. बाय रोड बसप्रवास करण्याऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास प्रवासी अधिक पसंती दर्शवित असतात. दरम्यान आता देशात उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. या उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गावर आता स्पेशल ट्रेन सुरू केल्या जात आहेत.
या ट्रेनमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निश्चितच फायदा होणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेमध्ये अतिरिक्त गर्दी वाढू शकते यामुळे वेगवेगळ्या मार्गावर स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. यामध्ये पुण्याहून अमरावतीला देखील एका स्पेशल ट्रेनची सुरुवात होणार आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘हा’ भुयारी मार्ग झाला सुरु; आता शहरातील वाहतूक कोंडी फुटणार
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 17 एप्रिल 2023 पासून पुणे ते अमरावती दरम्यान साप्ताहिक गाडी सुरू होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ०१४५२ क्रमांकाची विशेष एक्स्प्रेस पुण्याहून येत्या १७ एप्रिलला म्हणजे सोमवारपासून धावणार आहे. तर ०१४५१ क्रमांकाची अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस १८ एप्रिलपासून म्हणजे मंगळवारपासून धावणार आहे.
ही ट्रेन मात्र कायमस्वरूपी सुरू राहणार नाही तर एका विशिष्ट कालावधीसाठी ही ट्रेन सुरू केली जात आहे. ही ट्रेन उन्हाळी सुट्ट्या असेपर्यंत म्हणजेच 27 जून 2023 पर्यंत सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आहे. आता आपण या ट्रेनच वेळापत्रक आणि या ट्रेनला नेमके कुठे थांबे राहणार आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- नवी मुंबई वासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ अतिमहत्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प मे महिन्यात होणार सुरु; पहा तारीख
येथे राहतील थांबे?
या साप्ताहिक रेल्वेगाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर या रेल्वे स्थानकावर थांबे दिले जाणार असल्याचे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कस राहणार वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी दर सोमवारी पुणे येथून सायंकाळी सात वाजून 55 मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 11 वाजता अमरावतीला पोहचणार आहे. तसेच या गाडीच्या अमरावतीहून पुण्याकडील प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी दर मंगळवारी अमरावतीहून सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्यात पोहोचणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ स्टेशनवर पण थांबणार ! केंद्रीय मंत्र्यांने दिली माहिती