Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे पुण्याहून विदर्भाला रेल्वे मार्गाने जाणे सोयीचे होणार आहे. खरेतर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ते विदर्भादरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात.
विदर्भातूनही दररोज असंख्य नागरिक पुण्याकडे येतात. यामुळे या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कायमच गर्दी पाहायला मिळते. दरम्यान या मार्गावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते अमरावती दरम्यान धावणाऱ्या द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा कौतुकास्पद निर्णय मध्य रेल्वेच्या माध्यमातून नुकताच घेण्यात आला आहे.
आठवड्यातून दोनदा धावणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन विदर्भातून पुण्याला येणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या ट्रेनला मुदतवाढ मिळाली पाहिजे अशी रेल्वे प्रवाशाची मागणी होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ दिली आहे. वास्तविक, अमरावती सहित संपूर्ण पश्चिम विदर्भातील नागरिक कामानिमित्त, व्यवसायानिमित्त आणि शिक्षणानिमित्त पुण्यात येत असतात.
त्यामुळे या विशेष एक्सप्रेस ट्रेनमध्ये अजूनही गर्दी पाहायला मिळत आहे. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर या ट्रेनला आता मुदतवाढ मिळाली आहे.
आधी ही ट्रेन 28 जानेवारीपर्यंत चालवली जाणार होती मात्र आता या गाडीला मुदतवाढ मिळाली असून ही ट्रेन मार्च अखेरपर्यंत धावणार आहे.
पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत दर शुक्रवारी व रविवारी पुणे स्थानकावरून सोडली जाणार आहे. हि गाडी या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री २२:५० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १७:३० वाजता अमरावती स्थानकावर पोहोचणार अशी माहिती समोर आली आहे.
तसेच अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस १ मार्चपर्यंत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी शनिवारी अन सोमवारी अमरावती स्थानकावरून सोडली जाणार आहे.
या दिवशी ही गाडी अमरावती येथून १९:५० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १६:२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाने दिली आहे.