Pune Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी पुण्याहून खानदेशकडे अन खानदेशहुन पुण्याकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक खास आहे. खरे तर खानदेश मधील एक मोठा वर्ग पुण्यात शिक्षण, रोजगार, नोकरी, उद्योग निमित्ताने वास्तव्याला आहे. यामुळे पुण्याहून खानदेशला अन खानदेशहुन पुण्याला दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात.
हे हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करण्याला पसंती दाखवतात. यामुळे पुणे ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या काही काळापासून जोर धरत आहे. खरंतर भुसावळ व खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी हुतात्मा एक्सप्रेस खूपच फायदेशीर ठरत होती.
मात्र ही एक्सप्रेस आता विदर्भातील अमरावती येथून सोडली जात आहे. त्यामुळे भुसावळ येथून थेट पुण्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस सुरू केली गेली पाहिजे अशी मागणी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही काळापासून उपस्थित केली जात आहे.
दरम्यान याच रेल्वे प्रवाशांच्या मागणीवर आता सकारात्मक असा निर्णय घेतला जाणार असे चित्र तयार होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या मागणी बाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याने भुसावळ सहित संपूर्ण खानदेशातील प्रवाशांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला की या मार्गावर लगेचच स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. विशेष म्हणजे, ही स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन सुरू व्हावी यासाठी जळगाव जिल्ह्यातून आता मोठा पाठपुरावा सुरू झाला आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आता केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत भेट घेतली असून त्यांनी पुणे ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र रेल्वे सुरू करावी अशी मागणी यावेळी केली आहे.
विशेष म्हणजे खासदार महोदय यांच्या या मागणीवर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे ते भुसावळ दरम्यान स्वतंत्र एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार अशी आशा बळावली आहे.