Pune Railway News : पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि एक प्रमुख आयटी हब म्हणून अलीकडे नावारूपाला आले आहे. सोबतच पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
शहरात मोठ्या प्रमाणात राज्यातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. तसेच कामासाठी देखील पुणे शहरात वेगवेगळ्या राज्यातून नागरिक दाखल झाले आहेत.
यामध्ये राजस्थान राज्यातील नागरिकांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजस्थान मधील पाली आणि जोधपूर या दोन जिल्ह्यातील जवळपास सात ते आठ लाख नागरिक पुणे लगतच्या जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मुंबई ट्रांस हार्बर लिंकचा ‘हा’ महत्त्वाचा टप्पा पूर्ण, एमएमआरडीएने दिली माहिती
दरम्यान या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे ते पाली दरम्यान एक सुपरफास्ट ट्रेन सुरू केली जाणार आहे. वास्तविक पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या राजस्थानी लोकांची गेल्या अनेक वर्षांपासून ही ट्रेन सुरु करण्याची मागणी होती.
अखेर ही मागणी आता पूर्ण झाली आहे. आतापर्यंत राजस्थानी लोकांना पुण्यातून प्रवास करण्यासाठी केवळ पुणे ते जोधपूर हे आठवड्यातून एकदा चालवली जाणारी सुपरफास्ट ट्रेन उपलब्ध होती.
एकच गाडी आठवड्यातून उपलब्ध असल्याने या लोकांना राजस्थानकडे प्रवास करण्यासाठी एक तर मुंबईला जावे लागायचे नाही तर मग अहमदाबाद येथे प्रवास करून तेथून मग पाली किंवा जोधपुर साठी ट्रेन पकडावी लागत असे.
हे पण वाचा :- सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गात बाधित शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा, महत्त्वाचं पत्र जारी, पहा….
यामुळे या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. राजस्थानी लोकांची होणारी ही हेळसांड पाहता पालीचे खासदार पी. पी. चौधरी, दिवंगत माजी खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे वारंवार या संदर्भात मागणी केली होती.
दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीवर आता सकारात्मक असा निर्णय घेतला आहे. आता पाली ते पुणे दरम्यान एक सुपरफास्ट ट्रेन चालवली जाणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक?
याबाबत खासदार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन 30 मे 2023 पासून सुरू होणार आहे. ही गाडी दर मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शन कडे रवाना होणार आहे. तसेच मारवाड जंक्शन वरून ही ट्रेन दर बुधवारी पुण्याकडे रवाना होणार आहे.
हे पण वाचा :- सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; यंदा सोयाबीनचे घरचे बियाणे वापरताना ‘ही’ काळजी घ्या, वाचा