Pune Railway News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष महत्त्वाची राहणार आहे. नुकताच भारतात दिवाळीचा मोठा सण साजरा झाला आहे. दिवाळीच्या सणाला देशातील विविध रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यामध्ये पुण्याहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. आता दिवाळीचा सण संपला आहे मात्र तरी देखील दिवाळीत गावी गेलेले लोक परत आपल्या कर्मभूमीकडे परतत असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
शिवाय पुढल्या महिन्यात ख्रिसमस अर्थातच नाताळचा मोठा सण येणार असल्याने तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक रेल्वेने प्रवास करणार असल्याने पुढील महिन्यातही रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी राहण्याची शक्यता आहे.
यंदा 25 डिसेंबरला ख्रिसमस अर्थातच नाताळचा सण राहणार आहे. दरम्यान नाताळनिमित्त आणि नववर्षानिमित्त वाढणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयाचा पुणे शहरातील आणि नागपूर मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने पुणे ते अजनी दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष एक्सप्रेस गाडीच्या पुणे ते अजनी आणि अजनी ते पुणे अशा प्रत्येकी दोन फेऱ्या अर्थातच या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे ते अजनी दरम्यान गाडी क्रमांक 01465 चालवली जाणार आहे. ही सुपरफास्ट एक्स्प्रेस २६ डिसेंबर २०२३ आणि २ जानेवारी २०२४ या दोन दिवशी चालवली जाणार आहे.
ही गाडी या कालावधीत पुणे स्थानकावरून १५:१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. तसेच परतीच्या प्रवासात अजनी ते पुणे दरम्यान गाडी क्रमांक ०१४६६ ही विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार आहे.
ही एक्स्प्रेस ट्रेन २७ डिसेंबर २०२३ आणि ३ जानेवारी २०२४ रोजी चालवली जाणार अशी माहिती समोर आली आहे. ही गाडी नागपुर येथील अजनी स्थानकावरून १९:५० वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ११:३५ वाजता पुण्याला पोहोचणार अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ?
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही गाडी दौंड कॉर्डमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे.