Pune Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे ते दानापुर आणि पुणे ते गोरखपूर या विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
आता आपण मध्ये रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या या विशेष गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत. तसेच, या गाड्यांना कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे हे थोडक्यात पाहणार आहोत.
होळी सणाला आणि धुलीवंदनाला दरवर्षी रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त गर्दी पाहायला मिळते. यंदाही मोठ्या प्रमाणात या सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने पुणे ते गोरखपूर आणि पुणे ते दानापूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे ते दानापुर विशेष रेल्वेचे वेळापत्रक
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते दाणापूर ही विशेष रेल्वेगाडी 21 मार्च रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी पुणे येथून सकाळी ६.३० वाजता सुटणार आहे.
तसेच, दाणापूर ते पुणे अतिजलद विशेष रेल्वेगाडी दाणापूर येथून २२ मार्चला सोडली जाणार आहे. ही गाडी दानापूर येथून दुपारी १.३० वाजता सुटणार आहे.
पुणे-दानापूर गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वेगाडीला राज्यातील हडपसर (फक्त पुणे ते दाणापूरसाठी), दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.
पुणे ते गोरखपुर विशेष रेल्वेचे वेळापत्रक
पुणे ते गोरखपूर दरम्यानची विशेष रेल्वेगाडी 22 मार्चला सोडली जाणार आहे. पुणे येथून ही गाडी दुपारी सव्वा चार वाजता सुटणार आहे.
तसेच गोरखपूर ते पुणे विशेष रेल्वेगाडी 23 मार्चला गोरखपूर येथून सोडली जाणार आहे. ही गाडी गोरखपूर येथून रात्री ११.२५ वाजता सुटणार आहे.
पुणे-गोरखपूर विशेष गाडी कुठे थांबणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष रेल्वेगाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. ही गाडी राज्यातील दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.