Pune Railway News : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच दीपोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा झाला आहे. दरम्यान दिवाळीनंतर रेल्वे प्रशासनाने छठपूजेच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी वरून अर्थातच पुण्यावरून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दिवस या विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यावरून सुटणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन उपराजधानी नागपूर मार्गे धावणार आहे. खरे तर दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
दिवाळीनंतरही प्रवाशांची संख्या लगेचच कमी होत नाही. सोबतच दिवाळीनंतर छटपूजेसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. यामुळे हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय.
हडपसर ते बिलासपुर दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
ही स्पेशल ट्रेन बिलासपूर येथून ८ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता मार्गस्थ होईल. त्यानंतर ती रायपूर, दुर्ग, मार्गे रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचणार आहे मग दुसऱ्या दिवशी अर्थातच नऊ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच ही विशेष गाडी हडपसर येथून नऊ नोव्हेंबरला तीन वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी १० नोव्हेंबरला सकाळी ८.२० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचणार आहे. मग येथून पुन्हा गोंदिया, दुर्ग, रायपूरमार्गे दुपारी ३.३० वाजता बिलासपूरला पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही स्पेशल ट्रेन या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला थांबा मंजूर राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.