Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे येथील हडपसर रेल्वे स्थानकावरून विशेष एक्सप्रेस ट्रेन सोडली जाणार आहे. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दी लक्षात घेता हडपसर ते बिकानेर दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष गाडी सोडली जाणार आहे.
हडपसर ते बिकानेर अशी एक फेरी आणि बिकानेर ते हडपसर अशी एक फेरी अशा या विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चालवण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला असून यामुळे हडपसर ते बिकानेर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक नेमके कसे आहे? ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ? या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 10 नोव्हेंबरला हडपसर-बिकानेर विशेष गाडी हडपसर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही ट्रेन १० नोव्हेंबर रोजी हडपसर येथून रात्री ८ वाजता सोडली जाणार आहे अन बिकानेरला तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी पोहोचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
तसेच, बिकानेर-हडपसर विशेष गाडी बिकानेर येथून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी सोडली जाणार आहे अन दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी हडपसर येथे पोहोचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
विशेष ट्रेन कोणत्या स्थानकावर थांबणार ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, फुलेरा, कुचमन शहर, मकराना, देगाणा, मेड़ता रोड, नागपूर आणि नोखा इत्यादी स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती देण्यात आली आहे.
ही विशेष गाडी या मार्गावरील जवळपास 27 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार असल्याने या गाडीचा या मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेकांना फायदा होईल अशी आशा आहे. यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून या विशेष गाडीचा नागरिकांनी अधिका-अधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.