Pune Railway News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी रक्षाबंधनाचा मोठा सण येणार आहे. त्याआधी स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सण साजरा होणार आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या कालावधीत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.
यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून रेल्वे विभागाने विशेष गाड्या चालवल्या पाहिजेत अशी मागणी केली जात होती. दरम्यान प्रवाशांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर अन प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे विभागाने पुणे रेल्वे स्टेशन वरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे ते नागपूर दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार असून आज आपण याच गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
नागपूर -पुणे विशेष गाडी आज बुधवार आणि शुक्रवारी नागपूर येथून सायंकाळी सात वाजून ४० मिनिटांनी सोडली जाणार आहे. तसेच ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचणार आहे.
तसेच पुणे नागपूर विशेष एक्सप्रेस गाडी गुरुवारी आणि शनिवारी पुणे येथून दुपारी ४.१० वाजता सोडली जाईल आणि नागपूर येथे साडे सहा वाजता पोहोचणार आहे.
या विशेष एक्सप्रेस गाडीच्या नागपूर ते पुणे दरम्यान दोन आणि पुणे ते नागपूर दरम्यान दोन अशा चार फेऱ्या होणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान होईल अशी आशा आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे आज नागपूरहून पुण्याला प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या गाडीच्या चार फेऱ्या होणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि उरळी या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.