Pune Railway News : आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पावन पर्व साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या या पावन पर्वाच्या दिवशी राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे.
कारण की रेल्वे प्रशासनाने पुणे ते करीमनगर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यामुळे नक्कीच विदर्भातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे नेमके वेळापत्रक कसे आहे, ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे-करीमनगर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक नेमके कसे आहे?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे करीमनगर विशेष एक्सप्रेस ट्रेन 21 ऑक्टोबर 2024 ला चालवली जाणार आहे. तसेच करीमनगर पुणे ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 23 ऑक्टोबरला चालवली जाणार आहे.
पुणे – करीमनगर विशेष एक्सप्रेस ट्रेन सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे येथून रात्री २२:४५ वाजता रवाना होईल. ही गाडी अहिल्यानगर येथे २:०० वाजता, मनमाड ५:२०, छत्रपती संभाजीनगर ७:३५, जालना ८:३२, नांदेड १२:१५, आदिलाबाद १६:१०, चंद्रपूर २०:३७, बल्लारशाह २१:५०, करीमनगर येथे बुधवारी रात्री २:०० वाजता पोहोचणार आहे.
तसेच करीमनगर पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन 23 ऑक्टोबरला सकाळी ६:०० वाजता करीमनगर येथून रवाना होणार आहे. मग बल्लारशाह येथे १०:१० वाजता पोहोचेल.
चंद्रपूर १०:३०, आदिलाबाद १३:५५, नांदेड १७:३५, जालना २०:२२, छत्रपती संभाजी नगर २१:४५, मनमाड गुरुवारी पहाटे २:२५, अहिल्यानगर ६:०२, पुणे येथे ९:४५ वाजता पोहोचणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-करीमनगर-पुणे ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अहिल्यानगर, मनमाड, छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, आदिलाबाद, चंद्रपूर, बल्लारशाह या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.