Pune Onion Rate : कांदा हे नासिक, पुणे, अहमदनगर, धुळे यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची राज्यात खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शासनाने घेतलेल्या काही निर्णयामुळे कांदा बाजार भावात घसरण झाली आहे.
कांदा निर्यात बंद असल्यामुळे आणि बफारा स्टॉक मधील कांदा मात्र 25 रुपये प्रति किलो या दरात सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.
आता मात्र गेल्या आठवड्याभराचा विचार केला असता लाल कांद्याच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. सरासरी बाजार भाव आधीच्या तुलनेत थोडेसे वाढले आहेत.
मात्र तरीही शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा भाव अजूनही बाजारात मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील काही प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यात काय भाव मिळतोय
मिळालेल्या माहितीनुसार, आज 9 जानेवारी 2024 ला राज्यातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एपीएमसी मध्ये किमान 800 रुपये प्रति क्विंटल, कमाल दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी १८५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
तसेच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज किमान चारशे रुपये, कमाल 2191 रुपये आणि सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल असा भाव नमूद करण्यात आला आहे.
पुण्यातील पिंपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
तसेच येथील मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांदा किमान 500, कमाल 1500 आणि सरासरी एक हजार या दरात विकला गेला आहे.
तसेच कामठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज किमान पंधराशे, कमाल 2500 आणि सरासरी 2000 रुपये एवढा भाव मिळाला आहे.