Pune News : राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीमुळे विशेष ओळखलं जाऊ लागलं आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या या पार्श्वभूमीवर ट्रॅफिकची समस्या गहन बनत चालली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत. यामध्य शहरातील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी मेट्रो मार्ग विकसित करण्याचे कामे हाती घेण्यात आली आहेत. यात सिव्हिल कोर्ट ते रामवाडीदरम्यान पुणे मेट्रो रिच – ३ या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा देखील समावेश आहे.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! एप्रिल महिन्यात ‘या’ रूटवर सुरु होणार वंदे भारत ट्रेन; किती असेल तिकीट, कसा असेल रूट, पहा….
दरम्यान या प्रकल्पांतर्गत बंडगार्डन येथे मेट्रो स्टेशनच्या स्टील गर्डरचे काम सुरु होणार आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरुन तारकेश्वर चौकाकडे जाणाऱ्यां वाहतूकी बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्च 2023 ते 21 एप्रिल 2023 पर्यंत आंबेडकर सेतू वरून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
यामुळे या कालावधीत प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. यासोबतच एन. एम. चव्हाण चौक ते अॅडलॅब चौकदरम्यान महामेट्रोचे कल्याणीनगर रेल्वे स्टेशनचे काम सुरु आहे. त्यासाठी २७ जूनपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर येत आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस बाबत भारतीय रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! पहा संपूर्ण माहिती
दरम्यान आज आपण या दोन विभागातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते राहतील याबाबत जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोरेगाव पार्क विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरुन तारकेश्वर चौकाकडे जाणाऱ्यां वाहतूकिसाठी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. यासाठी खालील पर्यायी मार्ग राहतील.
1)पुणे स्टेशनकडून येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोडने, ब्ल्यू डायमंड चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, पर्णकुटी चौकमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकणार आहेत.
2)तसेच पुणे स्टेशनकडून येऊन बोटक्लबकडे जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले-पाटील रोडने इच्छितस्थळी जाऊ शकणार आहेत.
3)तसेच बोटक्लब रोडने येऊन येरवड्याकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून सरळ अमृतलाल मेहता रोडने कोरेगाव पार्क चौकातून इच्छितस्थळी जातील.
4)येरवडा येथून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, ब्ल्यू डायमंड चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जातील.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! कोस्टल रोड ‘या’ महिन्यात सुरू होणार; महापालिका आयुक्तांनी थेट तारीखच सांगितली
येरवडा विभागातील एन. एम. चव्हाण चौकाकडून अॅडलॅब चौकादरम्यान होणारी वाहतूक गरजेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. ज्यावेळी यादरम्यानची वाहतूक बंद राहील त्यावेळी प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. यादरम्यानच्या पर्यायी मार्गाबाबत बोलायचं झालं तर बिशप स्कूलकडून एन.एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड अॅडलॅब चौकातून उजवीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक ७ येथून डावीकडे वळून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाईल. तसेच, ए.बी.सी. चौकाकडून येणारी वाहतूक एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळून कल्याणीनगर लेन क्रमांक ३ येथून उजवीकडे वळून अॅडलॅब चौकाकडे जाऊ शकणार आहे.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच! 1 एप्रिलला ‘या’ दोन शहरादरम्यान सूरू होणार 11वी वंदे भारत ट्रेन; पहा संपूर्ण रूटमॅप