Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या मोठी जटिल बनत चालली आहे. आता पिंपरी चिंचवड शहराचा विकास देखील जलद गतीने होत असल्याने पिंपरी चिंचवड मध्ये देखील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अशातच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परस्परांना मेट्रो ने जोडली जाणार आहेत. यामुळे आता या दोन्ही शहरांदरम्यान चा प्रवास गतिमान होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात या दोन्ही शहरादरम्यानचा मेट्रो प्रकल्प पूर्ण होणार आहे. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हा प्रकल्प येत्या महिन्यात पूर्ण होण्याचे चित्र आहे. म्हणजे आता पुणे ते पिंपरी चिंचवड प्रवास मेट्रो ने करता येणार आहे. या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच हा मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेली माहितीनुसार मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच 15 मे च्या आसपास हा मार्ग प्रवासासाठी सुरू होऊ शकतो.
हे पण वाचा :- काय सांगता! वंदे भारत एक्सप्रेसने आतापर्यंत केला ‘इतक्या’ लाख लोकांनी प्रवास; पंतप्रधान मोदींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
गरवारे महाविद्यालय मेट्रो मार्ग देखील याच वेळेत सुरू होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. म्हणजे आता गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय या मेट्रो मार्गाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. आणि हे दोन्ही मार्ग आता लवकरच सुरु होणार आहेत. या दोन्ही मार्गावरील मेट्रोस्थानाकांचे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
महा मेट्रो ने केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही मार्गाचे कामे एप्रिल महिन्याअखेर पूर्ण होणार आहेत. या मेट्रो मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून याला परवानगी दिली जाईल. यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला हे मार्ग सुरू करण्यासाठी पत्र पाठवले जाणार आहे. यानंतर मग नगर विकास विभाग हे मार्ग सुरू करण्यासाठी एक तारीख फिक्स करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही मार्ग मे महिन्याच्या मध्यापर्यंत प्रवाशांसाठी सुरू केले जाऊ शकतात.
हे पण वाचा :- पुणे रिंग रोडबाबत महत्वाची बातमी; ‘या’ महिन्यात सुरु होणार प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम, पहा….
असे आहेत पुण्यातील मेट्रो मार्ग
आम्ही आपल्या माहितीसाठी नमूद करू इच्छितो की, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक हा 17 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग पूर्ण केला जात असून यापैकी महापालिका स्थानक ते फुगेवाडी दरम्यानचा सात किलोमीटरचा मार्ग यापूर्वीच प्रवाशांसाठी खुला झाला आहे. आता याचा विस्तारित मेट्रो मार्ग म्हणजेच फुगेवाडी स्थानक ते जिल्हा न्यायालयापर्यंत मेट्रो मार्ग पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा 8 किलोमीटरचा मार्ग असून या मार्गात फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय ही स्थानके राहणार आहेत.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरात आता लवकरच निओ मेट्रो धावणार; असा राहणार संपूर्ण प्रकल्प, पहा रूटमॅप
तसेच वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक हा सोळा किलोमीटरचा मार्ग पूर्ण केला जात असून वनाज स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हा ५ किलोमीटरचा मार्ग याआधीच पूर्ण झाला असून प्रवाशांसाठी हा मार्ग सुरू झाला आहे. आता गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक हा विस्तारित मार्ग पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
याच अंतर ५.१२ किलोमीटरच असून या मार्गात गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल ही स्थानके राहणार आहेत. निश्चितच या दोन विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- 14वी वंदे भारत ट्रेन आज सुरु होणार; कोणती महत्वाची शहरे होणार कनेक्ट, मुंबई-गोवा वंदे भारतला मुहूर्त केव्हा? पहा डिटेल्स