Pune News : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता गेल्या अनेक वर्षांपासून शहरात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे राज्य शासनाकडून राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवर दुरुस्तीचे कामे केली जात आहेत. तसेच काही मार्ग नव्याने विकसित होत आहेत. याव्यतिरिक्त काही ठिकाणी उड्डाणपूल देखील विकसित केले जात आहेत. चांदणी चौकात देखील जुना पूल पाडून नवीन पूल विकसित केला जात आहे.
हे पण वाचा :- नवी मुंबई वासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ अतिमहत्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प मे महिन्यात होणार सुरु; पहा तारीख
या पुलाचे आतापर्यंत 90% काम पूर्ण झाले असून हा पूल एक मे 2023 रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच यामुळे चांदणी चौक परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. अशातच आता चांदणी चौकातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्ग अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच पुणेकरांना या निमित्ताने दिलासा मिळणार आहे. हा मुख्य भुयारी मार्ग आता सुरू झाला असल्याने आता चांदणी चौकातून मुळशीकडे जाताना प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. या भुयारी मार्गाने आता मुळशी पौड मार्गे पुढे कोकणात देखील जाता येणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ स्टेशनवर पण थांबणार ! केंद्रीय मंत्र्यांने दिली माहिती
यामुळे मुळशीकडे जाताना प्रवाशांना सहन करावी लागणारे वाहतूक कोंडी आता कायमची दूर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निश्चितच या भुयारी मार्गामुळे प्रवाशांना दिलासा मिळणारां असला तरी देखील चांदणी चौकातील उड्डाणपूलाकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागून आहे.
हा उड्डाणपूल नेमका केव्हा सुरू होतो याचीच उत्सुकता पुणेकरांना लागून आहे. एक मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिन या पुलाचे उद्घाटन नियोजित असले तरी देखील या कालावधीत हा पूर्ण होणार नसल्याचे काही अधिकाऱ्यांकडून खाजगीत सांगितले जात आहे. यामुळे आता हा पूल नेमका केव्हा सुरू होतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना मिळणार मोठ गिफ्ट; आता मुंबई ते ‘या’ शहरादरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस !