Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता, शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्याती प्राप्त असलेल्या पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. काही ठिकाणी उड्डाणपूल विकसित होत आहेत तर काही ठिकाणी उन्नत मार्ग तयार केले जात आहेत.
दरम्यान एनडीए चौक अर्थातच चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी पाहता या ठिकाणी नव्याने उड्डाणपूल विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या उड्डाण पुलाबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, हा उड्डाणपूल एक मे 2023 रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनी पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार असा दावा केला जात होता. विशेष बाब म्हणजे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी स्वतः हा पूल एक मे रोजी सुरु होईल असे सांगितले होते.
हे पण वाचा :- पुणेकरांनो ऐकलंत व्हयं ! ‘या’ दिवशी ‘त्या’ महत्वाच्या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद; कारण काय? पहा….
परंतु या पुलाच्या सद्यस्थितीच्या कामाचा विचार केला असता हा पूल पूर्णपणे बांधून तयार होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. म्हणजे पुलाच्या बांधकामासाठी जवळपास जुलै महिना उजाडणार आहे. अशा परिस्थितीत या पुलाचे उद्घाटन आता एक मे रोजी होणार नसल्याचे चित्र आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य चौकातील उड्डाणपुलाचे काम एकूण चार टप्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये तीन ठिकाणी पिलर उभारण्यात येणार आहेत, त्यानंतर मग गर्डर टाकण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच गर्डर टाकण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यानंतर कॉंक्रिटीकरण करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
आता या कामासाठी वेळ हा लागणार आहेच. किमान दोन महिन्यालाचा कालावधी तरी यासाठी लागेल असे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. यामुळे चांदणी चौकातील या उड्डाणपुलाचे उद्घाटन एक मे 2023 ला होणार नाही असे चित्र तयार होत आहे. जुलैपर्यंत मात्र हे काम होऊ शकतं असं काही अधिकारी नमूद करत आहेत.
तर काही तज्ञांच्या मते हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या तर सप्टेंबर-ऑक्टोबरचा कालावधी याच्या पूर्णत्वासाठी लागू शकतात. यामुळे आता हा पूल नेमका जुलै महिन्यात तरी सुरू होईल का हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
हे पण वाचा :- कापूस दरात पुन्हा घसरण! दरवाढीची शक्यता अजूनही कायम आहे का? कापूस 9 हजार पार जाणार का? पहा काय आहे बाजारातील चित्र